![]() |
Agneevir Navy Selection Process |
Indian Navy Agneevir Selection Process : भारतीय अग्नीवीर नौदलामध्ये उमेदवारांची निवड कशा पद्धतीने होते याची सविस्तर माहिती पाहूया !!
Indian Navy Agneevir Selection Process : भारतीय नौदलामध्ये उमेदवारांची निवड कशा पद्धतीने होते ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नवीन योजनेनुसार म्हणजेच अग्नीवीर नेव्ही या नवीन योजनेनुसार उमेदवारांची निवड ही कशा पद्धतीने भारतीय नौदलामध्ये केले जाते आणि कोणकोणत्या पदांसाठी उमेदवारांची निवड होते ही माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ज्या उमेदवारांना भारतीय नौदलामध्ये भरती होण्याचे स्वप्न आहे. त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर माहिती आहे त्या उमेदवारांनी ही माहिती काळजीपूर्वक पहावे आणि ही माहिती वाचल्यानंतर आपल्याला उमेदवारांची निवड ही कशाप्रकारे होते याची माहिती सविस्तरपणे समजेल त्यामुळे उमेदवारांना अधिक माहिती घेण्याची गरज नाही यामध्ये आपल्याला अर्ज केल्यापासून ते फायनल सिलेक्शन पर्यंतचे सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन उमेदवार अग्नीवीर भारतीयांची तयारी करत असतात त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर माहिती आहे. त्यांना भरती होण्याचे स्वप्न असते आणि भरती प्रक्रियेची माहिती ही नसते त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर माहिती ठरणार आहे खालील प्रमाणे सविस्तर माहिती पहा.
Indian Navy Agneevir Selection Process : भारतीय अग्नीवीर नौदलामध्ये सामील होण्यासाठी वयोमर्यादा पहा.
भारतीय अग्नी वीर नौदलामध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना पुढील प्रमाणे वयोमर्यादा असणे आवश्यक आहे उमेदवारांचे वय या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 17.5 वर्षे ते 21 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे ते उमेदवार या भरतीसाठी आवश्यक अर्ज करू शकतात. भारतीय नौदलामध्ये अग्नीवीर योजनेमार्फत च्या उमेदवारांना कर्ज करायचे आहेत ते दोन पदांसाठी अर्ज करू शकतात त्या पदांची नावे आपण पाहूया Agneevir SSR आणि Agneevir MR या दोन पदांसाठी उमेदवार प्रामुख्याने अर्ज करू शकतात. या दोन पदांसाठी शैक्षणिक पात्रता पहा Agneevir SSR या पदासाठी उमेदवार हा विज्ञान शाखेतून 12th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. Agneevir MR या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात आणि ज्या उमेदवारांना दोन्ही पदासाठी अर्ज करायचा आहे ते उमेदवार या दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतात.
Agneevir NAVY Selection Process Steps : भारतीय नौदलामध्ये अग्निविर या पदांसाठी उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यांमध्ये होते ते टप्पे खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत याची सविस्तर माहिती घेऊया.
STAGE - I
ज्या उमेदवारांना भारतीय नौदलामध्ये अग्निवीर मार्फत भरती होण्यासाठी अर्ज करतात त्यांना पहिल्यांदा या भरतीसाठी अर्ज करावे लागतात अर्ज केल्यानंतर उमेदवारांचे हॉल तिकीट येते त्यामध्ये उमेदवारांना ऑनलाइन ( CBT Test) सीबीटी टेस्ट द्यावी लागते. ही परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांचे पुढील चरणामध्ये जाण्यासाठी मेरिट लागते या मेरिटमध्ये ज्या उमेदवारांचे नाव आलेले आहे ते पुढील चरणांमध्ये पोहोचत असतात त्या उमेदवारांचे पुढील चरणासाठी हॉल तिकीट येते ते उमेदवारांनी डाऊनलोड करून पुढील चरणासाठी तयार राहावे लागते.
STAGE - II
Navy Agneevir PFT उमेदवारांचे त्या भरतीसाठी कोणकोणते इव्हेंट होतात ते पुढील प्रमाणे पाहू या मध्येच उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होते नंतर पुढील प्रोसेस साठी उमेदवारांना जावे लागते.उमेदवारांना ग्राउंड वर बोलवले जाते आणि उमेदवारांचे पहिल्यांदा 1600 मीटर हा इव्हेंट घेतला जातो. त्यासाठी उमेदवारांना साडेसहा मिनिटांचे टाइमिंग देण्यात येते नंतर 10 Sit-ups मारावे लागतात त्यासाठी एका मिनिटाचे टाइमिंग देण्यात येते यानंतर 10 Push-up मारावे लागतात त्यानंतर एका मिनिटांमध्ये 20 Squats मारावे लागतात यानंतर उमेदवारांना पुढील इव्हेंट साठी वेळ देण्यात येतो नंतर उमेदवारांना मेडिकल टेस्ट साठी बोलवण्यात येते यामध्ये संपूर्ण मेडिकल चेकअप उमेदवारांचे केले जाते. काही उमेदवारांना रि मेडिकल देण्यात येते त्यानंतर उमेदवारांना ठराविक वेळ देण्यात येतो त्या वेळेच्या आत रि मेडिकल पॉईंट क्लिअर करण्यासाठी तारीख देण्यात येते त्या तारखेला उमेदवार रे मेडिकल पॉईंट क्लिअर करून घेतात उमेदवारांची मेडिकल झाल्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येते त्यानंतर उमेदवारांना पुढील मेरिट लिस्ट ची वाट पहावी लागते.
STAGE - III
तिसऱ्या चरणासाठी उमेदवारांचे ईमेल द्वारे हॉल तिकीट येते आणि अधिकृत वेबसाईटला देखील हॉल तिकीट येते यामध्ये उमेदवारांचे जे उमेदवार दुसऱ्या चरणामध्ये मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहेत त्यांना ट्रेनिंग सेंटर यामध्ये जाण्यासाठी इंडियन नेव्ही मार्फत कॉल अप लेटर येते Call-up Latter यामध्ये उमेदवारांचे माहिती देण्यात येते यानंतर उमेदवारांना ट्रेनिंग सेंटरवर जाऊन फायनल मेडिकल चेकअप साठी बोलवण्यात येते आणि यामध्ये जे उमेदवार सिलेक्ट होतात ते उमेदवार ट्रेनिंग साठी बोलवण्यात येतात आणि मग त्यांचे ट्रेनिंग सुरू होते याद्वारे भारतीय नौदलामध्ये अग्नीवीर या पदांसाठी उमेदवारांचे अशाप्रकारे निवड होत असते.
भारतीय नौदलामार्फत अशाच विविध पदांसाठी सिलेक्शन प्रोसेसची माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हावे यामध्ये आपल्याला सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि भारतीयांचे अपडेट्स आणि सविस्तर माहिती देण्यात येईल. आणि ही माहिती आपल्या भरती करणाऱ्या मित्रांना अवश्य शेअर करावे कारण ही माहिती खूप फायदेशीर आहे. भरती करणाऱ्या मित्रांसाठी दुसरीकडे माहिती पाहण्याची गरज नाही यामध्ये आपल्याला सर्व सविस्तर प्रमाणे भारतीयांना दलामध्ये कशाप्रकारे उमेदवारांचे सिलेक्शन केले जाते ही माहिती देण्यात आलेली आहे.