![]() |
Ladki bahin eKYC |
लाडकी बहिण eKYC कशी करायची लाडकी बहिण eKYC डायरेक्ट लिंक
Ladki bahin eKYC : लाडकी बहिण ekyc सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामधील पात्र लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची आणि फायदेशीर बातमी आहे, कारण दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करायचे असतात. सरकारने आता दर वर्षी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाडक्या बहिणींसाठी eKYC करणे आवश्यक केले आहे. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रामधील पात्र लाडक्या बहिणींनी दर वर्षी दिलेल्या सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन eKYC करून घ्यावी. लाडकी बहिण योजनेची ekyc कशी करायची ते आणि लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती त्याची माहिती सविस्तर देण्यात आली आहे. Ladki bahin eKYC, ladki bahin yojna ekyc .
लाडकी बहिण योजनेची उद्दिष्टे लाडकी बहिण योजना प्रामुख्याने महाराष्ट्रा मद्धे सुरू झाली. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी सरकारने दर महिन्याला १,५०० रुपये पात्र लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आले. आणि हे चालू राहण्यासाठी सरकारने दर वर्षी लाडक्या बहिणींनी eKYC करणे आवश्यक केले आहे. या योजनेच्या लाभामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आर्थिक मदत होत आहे. रोजच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक संकटे दूर होतात. कुटुंबातील काही आर्थिक अडचणीत दुर होतात. महिलांणा सक्षम करण्यासाठी सरकार अशा योजना प्रामुख्याने सुरू करण्यात येत असतात.
लाडकी बहिण eKYC कशी करायची ?
लाडकी बहिण योजनेची ekyc करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी माहिती असणे आवश्यक आहे. लाडकी बहिण ekyc करणे गरजेचे आहे, करावी लागणार आहे. नाहीतर लाडकी बहिण योजनेचा १,५०० रुपयांचा हप्ता येणार नाही जर यापुढेही १,५०० रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर लाडकी बहिण योजनेची ekyc प्रत्येक लाडक्या बहिणींनी करून घ्यावे. नारी शक्ती दुत ऍप मधुन फाॅर्म भरलेला आहे. त्यांनी सुद्धा ekyc करून घ्यावे. सर्वाची kyc एकाच पोर्टल वर करण्यात येणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईलवर सुद्धा पोर्टल वर ekyc करु शकता. या बद्दल माहिती सविस्तर वाचा.
सर्वात प्रथम लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट वर जायचे लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट: ladakibahin.maharashtra.gov.in ही आहे. या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जायचे वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल. त्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा, असे पुढील चौकोनात दिसेल. यावर तुम्ही क्लिक करायचे क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलवर/ लॅपटॉप/ कंप्युटर वर लाडकी बहिण योजनेच्या eKYC चे पेज दिसेल.
लाडकी बहिण eKYC डायरेक्ट लिंक, ladki bahin eKYC direct link
या eKyc च्या पेजवर तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीची ekyc करायची आहे, त्यांचा आधार क्रमांक त्यावर टाकायचा आहे . त्याच्याच खाली कॅप्चॅ कोड टाकायचा आहे. खालील चौकोनात मि सहमत आहे असा एक चोकोण दिसेल यावर क्लिक करून OTP पाठवून घ्यावा. आता लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड लाख कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल. सबमिट करा अशा खालील पर्यायावर क्लिक करा. सबमिट होत नसेल तर परत हा OTP परत पाठविण्याचा प्रयत्न करा . सबमिट झाल्यानंतर काही महत्त्वाचे माहिती भरायची आहे. आता लाडकी बहिण योजनेची ekyc कशी करायची हे तुम्हाला माहिती झाले असेल त्याच पद्धतीने करुन घ्यावी. E kyc direct link click here